गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (10:14 IST)

'संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात घर चालवून दाखवावं'

संजय राऊत यांना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाप्रती बोलता येत नसेल तर किमान आत्महत्या वाढवण्याचं काम तरी करू नये, त्यांनी जिभेवर ताबा ठेवावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं, असं आव्हान एसटी कर्मचाऱ्यांनी केलं आहे.
 
राज्यात एसटी कामगारांचा संप अजूनही सुरुच आहे. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहिल अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
 
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आहे त्या पगारावर काम करावं असं वक्तव्य संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. या वक्तव्याचा निषेध आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी येथे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "महाविकास आघाडीचे सुत्र जुळवण्यासाठी खा.संजय राऊतांनी जसी धावपळ करुन मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंना बसवले. तशीच धडपड आमच्या मागण्यांप्रती दाखवून पुढाकार घेत आमचाही प्रश्न मार्गी लावावा."