शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (12:34 IST)

'बंदूक असती तर गोळ्या घातल्या असत्या' NCP आमदार दुर्राणी यांना धमकी

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना एकाने धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली जेव्हा ते पाथरी शहरातील नागरिक लालू कुरेशी यांच्या अंत्यसंस्कारासाठी गुरुवारी दुपारी माळीवाडा परिसरातील जुम्मा मशीद कब्रस्थान येथे आले होते.
 
दुर्राणी तेथे इतरांशी चर्चा करत असताना अचानक तेथे आलेल्या मोहम्मद बीन सईद बीन किलेब चाऊस याने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला. आमदार दुर्राणी यांना धक्का बुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. आता माझ्याकडे बंदूक असती तर तुला गोळ्या घालून ठार केलं असतं असं म्हटतं त्याने दुराणी यांच्यावर हल्ला केला.
 
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली. या घटनेनंतर संपूर्ण पाथरी शहरात तणावाचे वातावरण पसरून बाजारपेठ बंद कऱण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मोहमंद चाऊस या व्यक्तीविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद झाला आहे. फिर्याद दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
या घटनेचा पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत.