बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 डिसेंबर 2020 (09:19 IST)

नाशिकमध्ये 'बडे बाबा' ला अटक

बडे बाबा उर्फ पाथर्डीवाला गणेश जयराम जगताप या भोंदूबाबाने नाशिकसह इतर शहरातील काही लोकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर येत असून या बाबाला नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
 
पैशांचा पाऊस पाडतो, जमिनीतून सोने काढून देतो, सरकारी नोकर्‍या लावून देतो, असे अनेक गुंतागुंतीचे बहाणे देत या बाबाने अनेकांना गळाला लावले. अहमदनगर, नांदेड, लातूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, पुणे, अमरावतीसह राज्यातील अनके लोकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे यात मोठ्या उद्योजकदेखील सामील आहेत.
 
या बाबाने स्वत:च्या नावापुढे श्री श्री 1008 महंत गणेशानंदगिरीजी महाराज असे लिहून अनेकांना गंडा घातला. बडे बाबा मच्छिंद्रनाथ नावाने ट्रस्टही स्थापन केला. याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.