रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 डिसेंबर 2020 (09:18 IST)

सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर ठार

गेल्या महिनाभरापासून सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बारा बोअरच्या रायफलमधून तीन गोळ्या झाडून बिबट्याला जागीच खलास केले.
 
या बिबट्याने सोलापूर जिल्ह्यात तीन नरबळी घेतले होते. करमाळा तालुक्यातील वांगी नं. ४ राखुंडे वस्तीवर पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्या आला होता. 
 
अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे बारामतीचे तावरे यांच्यासमवेत या ऑपरेशनमध्ये सहभागी होते.
वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहिते-पाटील यांनी १५ फुटावरून नरभक्षक बिबट्यावर बारा बोअरच्या रायफलमधून तीन गोळ्या झाडल्या आणि बिबट्याला ठार केले.