मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (17:07 IST)

हर्षवर्धन जाधव यांची रवानगी येरवडा कारागृहात

हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. हर्षवर्धन जाधव यांना अटक केल्यानंतर त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होती. यावेळी न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आता त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे..
 
“हर्षवर्धन जाधव यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी त्यांची पोलीस कोठडीची मागणी राखून ठेवण्यात आली. परंतु त्यांना एका दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आम्ही जामिन अर्ज सादर केला. त्यानंतर न्यायालयानं सरकारी वकिल आणि आयओ यांचं म्हणणं मांडण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांनी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून आम्हाला म्हणणं मांडण्यासाठी मुदत हवी असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु न्यायालयानं त्यांना उद्याच म्हणणं मांडण्यास सांगितलं. जर उद्या म्हणणं मांडलं नाही तर उद्या जामिन अर्जावर सुनावणी करण्यात येणार आहे.