शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (17:24 IST)

कृष्णकुंजवर लोकांची गर्दी कायम, समस्या सरकारकडे मांडवण्यासाठी मनसेने पुढाकार घ्यावा, राज यांना विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी वारकरी, कोळी बांधव आणि मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड असोसिएशनच्या लोकांनी गर्दी केली. कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे, यात मंदिर उघडण्याची परवानगी अद्यापही सरकारने दिली नाही, कार्तिकी एकादशी जवळ आल्याने पंढरपूर मंदिर सुरु करावं अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. राज ठाकरेंनी ही समस्या सरकारकडे मांडावी यासाठी मनसेने पुढाकार घ्यावा असं राज ठाकरेंना विनंती करण्यात आली. 
 
तेव्हा एकादशी निमित्त वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का? त्यासाठी काय उपाययोजना करायल्या हव्या असं राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला विचारलं  तर मुंबईतल्या कोळी बांधवांनी गावठाणाची जमीन मालकीवर दिली जात नाही अशी तक्रार घेऊन राज ठाकरेंची  भेट घेतली.  त्याचसोबत सात-आठ महिन्यापासून लग्न व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे, मोठमोठे उत्सव, लग्न समारंभ बंद असल्याने ब्रास ब्रँन्ड व्यवसायिक अडचणीत आले आहेत, सगळीकडे अनलॉक करत असताना आमच्यावर बंदी का असं सवाल ब्रास बँन्ड पथकाने विचारला आहे, राज ठाकरेंकडे आमच्या समस्या मांडल्याने त्या सुटतील असा विश्वास या लोकांनी व्यक्त केला.