शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (10:22 IST)

बिहारच्या जनतेला जंगलराज नको, तर विकास हवा आहे : फडणवीस

“बिहारच्या जनतेला जंगलराज नको, तर विकास हवा आहे. हे त्यांनी या निवडणुकीतून सिद्ध केलं आहे. या निवडणुकीने आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणखी एक मोहर लागली आहे. बिहारच्या जनतेने बिहारचे मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवला आहे. मी बिहारच्या जनतेचं कोटी कोटी अभिनंदन करतो. त्यांना अभिवादन करतो”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
“भाजपने बिहारमध्ये 110 जागांवर निवडणूक लढली. यापैकी जितक्या जागांवर विजय मिळाला त्याचं प्रमाण 67 टक्के इतकं आहे. हे प्रमाण 2015 च्या निवडणुकीत फक्त 34 टक्के होतं. याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदीचं गरिब कल्याण अजेंडा आणि कठोर परिश्रम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना जातं. मी भाजपच्या बिहारच्या टीमचं अभिनंदन करतो”, असं फडणवीस म्हणाले.
 
“देशातील 11 राज्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे. बिहारसह या राज्यांमध्येही पंतप्रधान मोदींवर विश्वासाची लहर आहे. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगना तसेच इतर राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन”, असंदेखील देवेंद्र फडणवीस म्हणाले