अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांचे मराठी माणसांना भावनिक आवाहन
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी हे सध्या तुरुंगात आहेत. या मुद्यावर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशा वेळी अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी मराठी माणसांना भावनिक आवाहन केलं आहे. हे भावनिक आवाहन करताना अक्षता नाईक म्हणाल्या, सत्य आपोआप बाहेर पडतं, सत्याचा विजय होतो. सत्यासाठी उभे राहा, मराठी माणसांनी पाठीमागे उभे राहावे, असं आवाहन अक्षता नाईक यांनी केलं आहे.
अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक या सत्र न्यायालयाच्या आवारात उभ्या असताना त्यांनी सत्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन केलं.