जेव्हा पत्नी पतीवर थेट चोरीचा आरोप करते
पुण्यात पत्नीने पतीवरच थेट चोरीचा आरोप केला आहे. तिच्या तक्रारीची दखल घेत पोलिस तिच्या पतीवर गुन्हा देखील दाखल केला आहे. कँम्प परिसरातील गुरूद्वारा रस्त्यावरील एका आर्मी क्वार्टरमध्ये घडली. पतीनेच घरात येऊन घरातील दोन मोबाईल आणि गँस सिलेंडर असा एकूण 8000 रूपये किंमतीच्या वस्तू चोरून नेल्याची तक्रार पत्नीने केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पती व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. मात्र व्यवसाय फारसा चालत नव्हता. पती-पत्नी दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यामुळे दोघेही वेगळे राहात होते. दुपारी पती पत्नीच्या राहात्या घरी आला आणि त्याने पत्नीच्या घराच्या उघड्या खिडकीतून घरात प्रवेश केला. त्याने दोन मोबाईल आणि गँस सिलेंडर असा मुददेमाल चोरून नेला असल्याचा आरोप पत्नीने पतीवर केला आहे. त्यामुळे पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीची दखल घेऊन पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
पती-पत्नीच्या नात्यात तुझं-माझं काही नसतं असं म्हणतात. पण जेव्हा दोघांचं पटत नाही तेव्हा पत्नी पतीवरच थेट चोरीचा आरोप करते आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करते. तिच्या तक्रारीची दखल घेत पोलिस तिच्या पतीवर गुन्हा देखील दाखल करतात. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच ही कथा. याचप्रकारची एक घटना कँम्प परिसरातील गुरूद्वारा रस्त्यावरील एका आर्मी क्वार्टरमध्ये घडली. पतीनेच घरात येऊन घरातील दोन मोबाईल आणि गँस सिलेंडर असा एकूण 8000 रूपये किंमतीच्या वस्तू चोरून नेल्याची तक्रार पत्नीने केली आहे.
याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पती व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. मात्र व्यवसाय फारसा चालत नव्हता. पती-पत्नी दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यामुळे दोघेही वेगळे राहात होते. गुरूवारी ( 5 नोव्हेंबर) दुपारी 1.30 वाजता पती पत्नीच्या राहात्या घरी आला आणि त्याने पत्नीच्या घराच्या उघड्या खिडकीतून घरात प्रवेश केला. त्याने दोन मोबाईल आणि गँस सिलेंडर असा मुददेमाल चोरून नेला असल्याचा आरोप पत्नीने पतीवर केला आहे. त्यामुळे पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीची दखल घेऊन पतीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत करीत आहेत.