गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (21:51 IST)

राज्यात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट, विदर्भात कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला

Nashik is a hotspot of five places.
राज्यात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले असून आकडेवारीनुसार नंदुरबार, सातारा, अमरावती, नागपूर, नाशिक ही पाच ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. तर विदर्भात कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला आहे. तर अकोला, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.
 
 4 जानेवारीला राज्यात 48,801 सक्रिय रुग्ण होते तर 3 फेब्रुवारीला 37,516 रुग्ण होते. म्हणजेच महिनाभरात ही संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. पुणे, ठाण्यासह 21 जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. पण इतर 14 जिल्ह्यात हे प्रमाण वाढलं आहे. यात  सांगली, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. 
 
अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. 1 फेब्रुवारी रोजी हे प्रमाण 22 टक्के होतं तर आता सोमवारी ज्या 419 लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 235 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे हे प्रमाण 56 टक्क्यांवर गेलं आहे. 
 
नागपुरात 379 नवीन रुग्णाची नोंद झाली असून यात 5 रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णाच्या वाढीचा टक्का 2.52 असताना नागपूरमध्ये हा दर 3.08 टक्के आहे.