शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (21:40 IST)

साताऱ्यात बसस्थानकामध्ये शिवशाहीला आग, ५ गाड्या जळाल्या

साताराच्या बसस्थानकामध्ये शेजारीशेजारी उभ्या असलेल्या शिवशाहीच्या एका बसला अचानक आग लागली. त्यानंतर ही आग पेटत जावून पाचही गाड्यांना त्याची झळ पोहोचली असून  पाचही गाड्या जळून खाक झाल्याने असून कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवित हानी झालेली नाही. आगीच कारण समजू शकलेलं नाही.  
 
सायंकाळी पाच च्या सुमारास एका बसला अचानक आग लागली. ही आग लागल्याचे समजाताच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी धावत गेले. या कर्मचार्‍यांनी  अग्निशामक दल आणि हॉटेलमधील कर्मचार्‍यांना माहिती देवून पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच शेजारी-शेजारी उभ्या असलेल्या पाच ही बसेसनी पेट घेतला. त्यामुळे बसस्थानकात प्रचंड खळबळ उडाली.