भांडे ठेवताच गाय देते 4 ते 5 लिटर दूध..
गायीने भरपूर दूध द्यावं. त्यातून भरपूर उत्पादन मिळावं यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतो. यातले कष्ट कमी व्हावेत अशी इच्छा असते.पण या सगळ्यात काही भलतेच प्रकार समोर येतात. असाच एक आश्चर्याचा धक्का देणारा प्रकार समोर आला आहे. गाय (Cow)भांडे ठेवताच दुध द्यायला सुरूवात करत असल्याचं समोर आलं आहे. गाईच्या सडांमधुन आपोआप दुध येत असल्याने मगन भारूड (Magan Bharud) या शेतकऱ्याची गाय चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या 20 दिवसांपासुन असा प्रकार होत असल्याचं शेतकरी मगण भारूड यांनी सांगितलंय.
भांडे गाईच्या सडा खाली ठेवताच आपोआप 4 ते 5 लिटर दूध निघत आहे. सध्या सदर गाईचा दूध निघतानाचा व्हीडीओ सोशल मीडियावर वायरल होताच परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या 20 दिवसांपासून सदर गाय सकाळ संध्याकाळ दररोज 4 ते 5 लिटर दूध एका वेळेस देत आहे. सुरुवातीला अपोआप दूध निघताना पाहिल्यानंतर भारुड कुटुंबाला देखील आश्चर्य वाटले