गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (13:45 IST)

सेनेच्या टिझरमध्ये मनसेचं फुटेज?

gajanan kale
मुंबई शिवसेना पक्षप्रमुख यांच्या 14 में रोजी होणार्‍या सभेच्या टिझरवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. या टिझरमध्ये असलेली गर्दी राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेतील असल्याचा दावा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे. आता कळलं असली कोण आणि नकली कोण, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला अगावला आहे. आता शिवसेना यावर काय स्पष्टीकरण देणार हे पाहावे लागेल. 
 
संबंधित व्हिडीओ शेअर होताच यावर मनसेनं आक्षेप घेतला आहे. शिवसेनेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो आणि दृश्य वापरल्याचा दावा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या व्हिडीओमधील काही स्क्रीनशॉट्स आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.