मैत्रीणींचे अश्लिल फोटो काढून अपलोड केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास
मैत्रीणींचे अश्लिल फोटो काढून ते पार्न वेबसाईड आणि अन्य सोशल साईडवर अपलोड केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास आणि तीन लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. अक्षय श्रीपाद राव (रा.खोडनगर,इंदिरानगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा खटला मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.एस.भोसले यांच्या कोर्टात चालला.
या घटनेनेची माहिती अशी की, जुलै २०१६ ते १२ जून २०१७ दरम्यान आरोपी घरात कोणी नसल्याची संधी साधून दोघी मैत्रीणींना आपल्या घरी बोलावून घेत होता. त्यानंतर त्याने विश्वास संपादन करून दोन्ही मैत्रीणीचे विवस्त्र अश्लिल छायाचित्र काढले. काही कालावधीनंतर सदरचे फोटो त्याने पैसे कमविण्याच्या नादात पार्न वेबसाईड आणि अन्य सोशल साईडवर अपलोड केले. ही बाब निदर्शनास येताच दोघा पीडितांनी सायबर पोलीसात धाव घेतली होती. याप्रकरणी विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास सायबरचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक तथा सध्याचे वाडिव-हे पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल पवार यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र कोर्टात सादर केले होते.या खटल्यात सरकार तर्फे अॅड.सुधिर सपकाळे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंचानी दिलेली साक्ष ग्राह्य धरून आरोपीस वेगवेगळय़ा कलमान्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि तीन लाख रूपये दंडाची शिक्षा सु