मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मे 2022 (15:18 IST)

वृक्षतोडवरून संतापलेल्या अभिनेता सयाजी शिंदे यांचा संतप्त सवाल

sayaji shinde
अभिनेते, निसर्ग प्रेमी सयाजी शिंदे यांनी सुमारे 10 लाख वृक्षांची लागवड करून देवराईला जण माणसात पोहोचवले आहे. सयाजी शिंदे यांनी चित्रपटात जरी खलनायकाची भूमिका साकारली असली तरीही ते खऱ्या आयुष्यात मात्र हिरो आहे. त्यांच्या निसर्गाबद्दल असणाऱ्या प्रेमाबद्दल सर्वांनाच माहित आहे. त्यांना वृक्षांशी किती प्रेम आहे हे सर्वानाच विदित आहे. मात्र सध्या सयाजी शिंदे हे चांगलेच संतप्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे. आणि कारण आहे मुंबईतील सायन रुग्णालयातील वृक्षतोड. 

सायन रुग्णालयाजवळ असलेल्या डॉक्टरांच्या वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी मुबईतील प्रसिद्ध असलेल्या सायन रुग्णालयातील सुमारे 158 झाडे तोडली जाणार आहे. या साठी महापालिका मुंबईच्या वृक्ष प्राधिकरणाकडून रीतसर परवानगी देखील घेण्यात आली आहे. निसर्गप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांना वृक्ष तोडची माहिती मिळाल्यावर ते संतापले आणि त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत या वृक्षतोडला विरोध केला आहे.  

या व्हिडिओमध्ये ते म्हणत आहे की, ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं 158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?? याला दुसरा काहीच पर्याय सायन रूग्णालयाकडे नाही का? मला अपेक्षा आहे नव्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय रूग्णालय मागे घेईल. आपल्या एका निर्णयामुळे असंख्य पक्षांची घरटी, त्यातले छोटे जीव वाचणार आहेत. असं कॅप्शन देत त्यांनी व्हिडीओ शेअर केले आहे. 
 
सायन रुग्णालयातील झाडे डॉक्टरांच्या वसाहतीसाठी तोडली जात आहे. त्यासाठी 158 झाडे कापण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. एकाद्याच घर बनवण्यासाठी कित्येक पक्षींचे घर तोडले जात आहे. झाडांमुळे ऑक्सिजन मिळते. ऑक्सिजन किती आवश्यक आहे हे आपण सर्वानीच कोरोनाकाळात बघितलं आहे. आपण आपल्या माणसाचा जीव वाचावा म्हणून ऑक्सिजन विकत घेतले होतं. या झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते. मग आपण त्या प्राण वायू देणाऱ्या झाडांचे प्राण कसे काय घेऊ शकता. ? हे टाळता येत असेल तर त्याकडे विचार करावा. असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.