शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (08:19 IST)

मृत पावलेल्या तमाशा कलावंतास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ मदत मिळावी

death
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातलं पान्हेरा येथील कान्हू सती माते च्या यात्रेत जळगाव च्या आनंद लोकनाट्य मंडळाती दोन कलावंताचा झालेल्या दुर्दैवी अपघाती घटनेत मृत पावलेल्या कलावंतांच्या कुटूंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रूपये मदत मिळावी या साठी खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने आज जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले
 
खान्देश लोककलांवंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे कार्याध्यक्ष शेषराव नाना गोपाळ, उपाध्यक्ष शाहीर शिवाजीराव पाटील सह खान्देशातील विविध लोककला प्रकारात कार्यरत ५० कलावंतांच्या शिष्टमंडळाने आज जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले..
 
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यानी घडलेल्या दुर्दैवी घटने बद्दल दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्री महोदय यांना या घटनेचा तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले
 
खान्देशातील सुप्रसिद्ध तमाशा आनंद लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम दि २२ नोव्हेंबर रोजी पान्हेरा येथील कान्हू सती मातेच्या यात्रेत होता तमाशा तंबू ची उभारणी करताना लोखंडी राॅड चा विज वाहक तारेला स्पर्श झाल्याने तमाशा फडातील दोन कलावंत अनंतकुमार भारुडे नारायणगाव ता जुन्नर जि पुणे व विशाल भोसले रा राजूर गणपती यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या घटने मुळे खान्देशा सह संपुर्ण महाराष्ट्रातील तमाशा कलावंत हळहळला आहे
 
आज तमाशा मंडळाना आपला कार्यक्रम सादर करताना आनेक संकटाचा सामना करावा लागत आहे गांव गुंडाचा हल्ला,तमाशा तंबु जळणे..रस्ता आपघात अशा शेकडो घटना महाराष्ट्रात घडल्या व या घटनेनंतर आनेक तमाशा कलावंताना प्राण गमवावे लागले पंरंतु ह्या कलावंतांच्या जिवीताची हमी घेणारी एक ही योजना शासना स्तरावर राबविण्यात येत नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे