मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (08:05 IST)

बाळ बोठेच्या जामीनावर ‘या’दिवशी होणार निर्णय

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याने जामीन मिळण्यासाठी येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.या अर्जावर जिल्हा न्यायाधीश एम. व्ही कुरतडीकर यांच्यासमोर 29 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या करण्यात आली होती.
 
या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर बोठे पसार झाला होता.त्याला पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.आता त्याने जामीन मिळविण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. बोठेने वकिलामार्फत 14 जुलै रोजी न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यावर आता 29 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.