1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2019 (16:34 IST)

आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्या डॉक्टरला अटक

The doctor
फेसबुकवर हिंदू तसेच ब्राम्हणांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्या सुनीलकुमार निषाद या डॉक्टरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात विक्रोळीचे रहिवासी असलेल्या रवींद्र तिवारी यांनी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
 
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, तिवारी यांच्या तक्रारीच्या आधारे निषाद यांच्याविरोधात IPC च्या 295(A) या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना जाणून बुजून दुखावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. निषाद हे होमियोपथी डॉक्टर असून ते अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. या महिन्यामध्ये त्यांनी फेसबुकवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या काही पोस्ट अपलोड केल्या होत्या. गेली दोन वर्षे निषाद हे हिंदू आणि ब्राम्हणांविरोधात गरळ ओकणारं लिखाण करत होते.