राज्य सरकारकडून कांदा अनुदानाला मुदतवाढ
कांद्याचे भाव प्रचंड गडगडले असतानाच राज्य सरकारने कांदा अनुदानाची मुदत आणखी 15 दिवस वाढविली आहे. आता 31 डिसेंबरपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. यापूर्वी 15 डिसेंबरपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.
या वाढीव मुदतीचा फारसा फायदा शेतकर्यांना होण्याची शक्यता कमी असली तरी अत्यल्प दरात कांदा विकावा लागलेल्या कांदा उत्पादक शेतकर्यांच्या पदरात थोडेफार पैसे पडणार आहेत.कांद्याचे भाव उतरल्यानंतर 1 ते 15 डिसेंबरपर्यंत जो कांदा बाजार समित्यांत विकला गेला होता त्या कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपयांप्रमाणे प्रत्येक शेतकर्याला 20 क्विंटलपर्यंत मर्यादित असे अनुदान राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यात आता आणखी 15 दिवसांची वाढ झाली असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले.