1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जून 2017 (12:19 IST)

शरद पवारांकडून फडणवीस सरकारचे कौतुक

Fadnavis government's

शेतकऱ्यांची एकजूट ही समाधानकारक बाब आहे. सुकाणू समिती सगळे मतभेद दूर करून एकत्र आली आणि शेतकऱ्यांच्या पदरात सकारात्मक मिळालं. सरकारनेही सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार आणि सुकाणू समितीचं अभिनंदन केलं. औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन प्रकारचे कर्ज असतात. एक अल्प मुदतीचं कर्ज असतं आणि दुसरं दीर्घ मुदतीचं कर्ज असंत. मात्र सरकारने सरसकट कर्जमाफी केली आहे. त्यामुळे सर्वांचंच कर्ज माफ होईल, म्हणून सरकार अभिनंदनाला पात्र आहे. फक्त आता या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, असंही शरद पवार म्हणाले.