शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कंधार (जिल्हा नांदेड) , शनिवार, 2 एप्रिल 2022 (11:24 IST)

बापानेच चिमुकल्याला नदीत फेकले

पत्नीच्या अनैतिक संबंधातून अपत्य जन्माला आल्याचा संशयावरून वडिलांनी चार वर्षांच्या मुलाला बांधून गोदावरी नदीत फेकून दिल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी कंधार पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
  
 माधवराव देव्हारे असे आरोपीचे नाव असून अभिषेक देव्हारे असे मृताचे नाव आहे. माधवराव याचे दारूच्या नशेत पत्नीसोबत त्याचे नेहमी भांडण होत असे. बायकोवर संशय घेऊन तो नेहमी म्हणायचा की तो लहान मुलगा माझा नाही. 28 मार्चला अभिषेक शाळेतून घरी परत न आल्याने त्याची आई आणि कुटुंबीयांनी 29 मार्च रोजी कंधार पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.  पोलिसांनी कसून तपास करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आरोपी माधव देवहरे याच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.