शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 जून 2022 (07:40 IST)

गोमुत्र टाकत चौघांनी तरूणास केली मारहाण; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

crime
नाशिकच्या  लोहशिंगवे येथे अंगावर बादलीभर गोमुत्र टाकत चौघांनी तरूणास लाथाबुक्या व लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरूणाचा हात मोडला आहे. याप्रकरणी चेतन तुळशिराम चौधरी (२५ रा.सदर) या युवकाने तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज चौधरी (३५), विठोबा चौधरी (६५),मंजूळा चैधरी (६०) व संजय चौधरी (३८ रा.सर्व लोहशिंगवे पो.शेनित ता.जि.नाशिक) अशी तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. चेतन चौधरी  शेतात पाणी भरून सायंकाळच्या सुमारास जनावरांना चारा पाणी देण्यासाठी गोठ्याकडे जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने पायी जात असतांना पंकज चौधरी याने त्याच्या अंगावर गोमुत्राने भरलेली बादली ओतली. याबाबत चेतनने विचारणा केली असता चौघांनी कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ करीत त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी लाकडी दांडक्याचाही वापर करण्यात आल्याने चेतन चौधरी याचा हात मोडला असून अधिक तपास हवालदार गि-र्हे करीत आहेत.