लोणावळ्यात हरवलेल्या दिल्लीतील तरुणाचा मृतदेह सापडला

लोणावळा| Last Modified बुधवार, 25 मे 2022 (21:12 IST)
लोणावळ्यातील ड्युक्स नोज परिसरातून शुक्रवारी बेपत्ता झालेल्या तरुण अभियंत्याचा मृतदेह आज पाचव्या दिवशी ड्युक्स नोजच्या दरीत पायथ्यापासून साधारण साडेतिनशे फूट खोल दरीत आढळून आला. INS शिवाजीच्या पथकाला हा मृतदेह मिळून आला.

फरहान अहमद (वय 24, रा. दिल्ली) असे या तरुणाचे नाव आहे. हा युवक शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. सलग चार दिवस त्याचा विविध पद्धतीने शोध सुरु होता. मात्र तो मिळून न आल्याने त्याला शोधून देणाऱ्याला सोमवारी 1 लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले होते.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, फरहान अहमद हा दिल्ली येथील अभियंता काही कामासाठी कोल्हापुरला गेला होता. तो एका रोबोट बनविण्याच्या कंपनीत काम करीत होता. त्याला गिर्यारोहणाची आवड असल्याने कोल्हापूर व पुणे येथील काम उरकल्यानंतर तो लोणावळ्यात आला होता. शुक्रवारी ड्युक्स या ठिकाणी तो फिरायला गेला असताना, त्याला आपण रस्ता चुकलो असून, भरकटल्याचे समजल्यानंतर त्याने भावाला फोन करून रस्ता चुकलो असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळात त्याचा मोबाईल बंद झाला.
फरहानच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. त्याबरोबरच शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव मावळ आणि पोलीस दल शोध घेत होते. तर आज सकाळपासून NDRF आणि INS कडून फरहान शहा याचा शोध घेण्यात येत होता. अखेर आज सकाळी INS ला फरहान याचा मृतदेह डुक्सनोझ जंगलात आढळून आला.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

राकेश झुनझुनवाला कोण होते? त्यांना शेअर मार्केटमधील 'पारस' ...

राकेश झुनझुनवाला कोण होते? त्यांना शेअर मार्केटमधील 'पारस' का म्हणायचे?
शेअर मार्केटमधील सर्वांत मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आज (14 ऑगस्ट) निधन झालं. ...

Rakesh JhunJhunwala: ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला ...

Rakesh JhunJhunwala: ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन
शेअर बाजारातील ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी ...

भारताने विक्रम केला, जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची ...

भारताने  विक्रम केला, जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची दोन्ही टोके जोडली
काश्मीरला थेट राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा आणि जगातील सर्वात ...

Monkeypox in Delhi: दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण

Monkeypox in Delhi: दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण
दिल्लीत मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण आढळून आला आहे. लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ...

Noida: महिलेकडून रिक्षाचालकाला मारहाण

Noida: महिलेकडून रिक्षाचालकाला मारहाण
राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएटा येथे ई-रिक्षा कारने किरकोळ बाजूने धडक ...