बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (21:09 IST)

42 मतांचा कोटा संभाजीराजेंना देण्यास तयार, पण...,"

sambhaji raje
संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपला
 
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे छत्रपती  यांना शिवसेनेने  पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर आता मुंबईसह  राज्यातील घडामोडींना वेग येताना दिसत आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली असून संभाजीराजेंचा सन्मान म्हणूनच आम्ही त्यांना शिवसेनेच्या कोट्यातली जागा द्यायला तयार झालो, असं सांगताना संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेच्या कोट्यातली जागा संभाजीराजेंना द्यायला तयार झालो, तो त्यांचा सन्मान म्हणूनच. यापेक्षा शिवसेना काय करू शकते? ४२ मतं आम्ही त्यांना द्यायला तयार होतो. आमची अट नाही पण भूमिका एवढीच की तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा.
 
राजकीय पक्षात छत्रपती घराण्यातलं कोणी जात नाही हा समर्थकांचा दावा योग्य नाही. संभाजीराजेंना पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. राजघराण्यातले अनेक जण विविध राजकीय पक्षांमध्ये आले आहेत, पक्षांकडून लढले आहेत. सिनियर शाहू महाराजही शिवसेनेत आले होते.
 
संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपला, असं ठाम विधान संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या एका जागेवर उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली होती. मात्र संभाजीराजेंनी त्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापुरातल्याच दुसऱ्या नेत्याला उमेदवार म्हणून घोषित केलं. त्यावरून आता चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.