सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (09:12 IST)

अंत्ययात्रा चक्क पुराच्या पाण्यातून काढावी लागली आहे

antyatra
सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील नदी तुडुंब भरून वाहत असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पितापूर आणि आकांतळा या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची खूपच कमी असल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे. अशा स्थितीत परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. दरम्यान याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.
 
येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा चक्क पुराच्या पाण्यातून काढावी लागली आहे. गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यातून मृतदेह नदीच्या दुसऱ्या बाजुला नेला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नूरअली साहेब अली भंडारी असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते पितापूर येथील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यातून त्यांची अंत्ययात्रा काढली आहे.