रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2023 (08:27 IST)

दिलेली स्क्रिप्ट राज ठाकरेंनी वाचून दाखवली, उद्धव ठाकरे यांची टीका

वाचून दिलेली स्क्रिप्ट त्यांनी वाचली दुसरं काहीही केलेलं नाही.", असा प्रहार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेवर उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. मुंबईतील माहिमची समुद्रातील मजार हटवल्याबद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आले होते. तेव्हा पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
 
ते म्हणाले, "ती मजार इतकी वर्षे तिथे होती. त्यांच्या पक्षाचे आमदार, नगरसेवक तिथे होते. त्यापूर्वीपासूनचे बांधकाम होते. जशी स्क्रीप्ट आली तशी त्यांनी वाचून दाखविली", अशी टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, "

माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही?", असा प्रश्न त्यांनी विचारला.

Edited By - Ratnadeep ranshoor