“पद आज गेलीत, उद्या परत येतील, तेवढी हिंमत आमच्या…”
मागील महिन्यात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तसेच, राज्यातील सत्तासंघर्षावरील निकालही सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का दिला आहे.
संजय राऊत यांना शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी खासदार गजानन कीर्तिकर यांना संधी देण्यात आली आहे. गजानन कीर्तिकर हे सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झाले होते. यावर आता संजय राऊत यांनी भाष्य करत निष्ठा राखण्यासाठी पद गमवायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor