रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (21:31 IST)

सपनो का घर मिळणार, सरकार 31 मार्चपर्यंत 5 लाख घरे बांधणार

राज्य सरकार येत्या 31 मार्चपर्यंत राज्यात 5 लाख घरे बांधणार आहे. महाआवास योजना 2.0 अभियाना अंतर्गत ही घरे बांधण्यात येणार आहेत. या आधीही याच योजने अंतर्गत राज्य सरकारने ग्रामीण भागात पाच लाख घरे बांधून गोरगरीबांना हक्काचा निवारा दिला होता. आताही ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ  यांनी या घरांची घोषणा करून गोरगरीब जनतेला दिलासा दिला आहे. महाआवास अभियान 2.0 ची बैठक  मंत्रालयात आयोजित करण्यात आली. 
कोरोना काळ असतानाही महाआवास अभियानाचा पहिल्या टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. अनेक वर्षापासून बेघर आणि गरजू लोकांची यादी तयार करण्यात आली होती, मात्र त्यांना घरे मिळत नव्हती. या गरजू लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी ही मोहीम राबविण्यास आपण सुरूवात केली. या मोहिमेमुळे वेळेत घरे तयार करण्याची जिद्द आणि जागृती अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 5 लाख घरे बांधण्याचा संकल्प पूर्ण झाला आहे, असं मुश्रीफ म्हणाले.