सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (20:04 IST)

सुपर मार्केट मधील वाईन विक्री निर्णयावर राज्य सरकार पुनर्विचार करू शकते - शरद पवार

राज्यातील मॉल्स, सुपर मार्केट आणि किराणा दुकानांवर वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, राज्यभरात या निर्णयाला होणाऱ्या विरोध पाहता राज्यसरकार या वर पुनर्विचार करून वाईन ठेवण्याचा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो .  
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर एका ऑनलाइन कार्यक्रमात आपले मत मांडताना शरद पवार म्हणाले, 'सरकारने सुपरमार्केट, मॉल्स आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विकण्यास परवानगी दिल्याने सर्वत्र विरोध होत आहे. सर्व गोंधळ वाईन ला दारू म्हणून विचार करून आला आहे. लोकांना वाईन आणि इतर गोष्टींमधला फरक कळत नाही, त्यामुळे विरोध होत आहे. हा विरोध लक्षात घेऊन निर्णयाचा फेरविचार करून तो मागे घ्यावा लागला तर त्याचे वाईट वाटू नये आणि त्याला माझा आक्षेप नाही.