शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (17:54 IST)

मुंबई न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना समन्स बजावले

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई न्यायालयाने हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. हे प्रकरण गेल्या वर्षी डिसेंबरचे आहे.
 
मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 2 मार्चला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. बॅनर्जी यांच्या गेल्या वर्षी मुंबई दौऱ्यावर असताना राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने त्यांना हा आदेश दिला. मुंबई भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी ही तक्रार केली आहे.
 
न्यायालयाने असेही म्हटले आहे की ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्या तरी, त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मंजुरीची आवश्यकता नाही आणि त्या त्यांचे अधिकृत कर्तव्य बजावत नसल्यामुळे कोणताही प्रतिबंध लागू नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईत झालेल्या कार्यक्रमासंदर्भात न्यायालयाने ही माहिती दिली. 
 
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. येथे त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली. 
न्यायालयाने म्हंटले आहे की व्हिडीओ क्लिप मध्ये दिसत आहे की, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत गाताना मधेच थांबल्या नंतर मंचावरून निघून गेल्या. त्यांनी असे करून राष्ट्रगीताचे अवमान केले प्रथम दर्शनी दिसत आहे .
 
भाजपच्या मुंबई युनिटचे कार्यकर्ते विवेकानंद गुप्ता यांनी डिसेंबर 2021 मध्ये माजगावच्या मेट्रोपॉलिटन न्यायालयात तक्रार नोंदवली. त्यांनी आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुंबई यात्रेच्या दरम्यान राष्ट्रगीताची अवमानना केली. 
 
तक्रारदार गुप्ता यांचा दावा आहे की बॅनर्जी यांनी गृह मंत्रालयाच्या 2015 च्या आदेशाचे उल्लंघन केले आहे ज्यामध्ये राष्ट्रगीत वाजत असताना किंवा गायले जात असताना तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहणे आवश्यक आहे.