1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (19:17 IST)

समीर वानखेडे यांना धक्का, बार आणि रेस्टारेंटचा परवाना रद्द

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे प्रसिद्ध झालेल्या एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या नवी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला आहे. समीर वानखेडे यांच्या वयाची चुकीची माहिती देऊन सद्गुरू रेस्टॉरंट आणि बारचा परवाना घेतल्याचा आरोप त्यांच्यावर नवाब मलिक यांनी केला आहे. 

समीर वानखेडे यांनी परवान्यासाठी अर्ज केला तेव्हा तो अल्पवयीन होता. त्यांचे वय 17 वर्षे होते. अशा स्थितीत ते बारच्या परवान्यासाठी अर्ज कसा करू शकतात, असा प्रश्नही राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला. आता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कारवाई केली आहे. राजेश नार्वेकर यांनी या प्रकरणी 6 पानी आदेश देऊन परवाना रद्द केला आहे.

या हॉटेल आणि बारचा परवाना अर्ज 1997 मध्ये देण्यात आला होता. ठाणे जिल्हा दंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई केली आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.