1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (20:00 IST)

हर हर महादेव चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,शिवसेना नेते,आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली

Har Har Mahadev movie controversy
हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप माजी खासदार संभाजीराजे यांनी केला. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे येथील विवियाना मॉलमध्ये चित्रपटाचा शो सुरू असतानाच राडा झाला. या आंदोलनानंतर चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.या चित्रपटाच्या वादावर आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवरून वाद व्हायला नको. कोणताही वाद न करता त्यातून मार्ग काढावा.चित्रपटावरून राज्यात वाद नको. 
चित्रपट निर्मात्यांनी आपसात बसून वाद मिटवावा आणि काय असेल ते मोकळे बोलावे.
 
Edited by - Priya Dixit