सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (08:03 IST)

मोती तलावात कोसळलेल्या अल्पवयीन युवतीची ओळख पटली

child death
सावंतवाडीतील मोती तलावात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास एक युवती कोसळली होती . युवतीचा मृतदेह पाण्यात तरंगताना  बुधवारी सकाळी आढळून आला . मृतदेहाची ओळख पटली आहे . सदर युवती अल्पवयीन असून ती सावंतवाडी, न्यू खासकीलवाडा येथे राहते ती मूळ चंदगड येथील आहे. सावंतवाडीतील एका कनिष्ठ महाविद्यालयात सदर युवती इयत्ता ११ वी मध्ये शिकत होती. सदर युवतीच्या आईला घटनेची माहिती कळताच धक्का बसला असून त्यामुळे फिट आल्याने त्यांची प्रकृतीही खालावली आहे .युवतीच्या आईला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . सदरची युवती पाण्यात पडली की तिने स्वतःहून उडी घेतली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध सुरु होता . पण आज सकाळी मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसला , दरम्यान नगपलिका , सामाजिक बांधिलकीचे सदस्य , नागरिक व पोलिसांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आज यश आले.पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत .