गेली मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ होता म्हणून कमी अवयवदान झाले गेल्या वर्षभरात अवयवदानाचा आकडा वाढला
अवयवदानाचा आकडा वाढणे गरजेचे आहे. मागील दोन वर्षांच्या कोरोना काळात हा आकडा कमी झाला. मात्र, गेल्या वर्षभरात अवयवदानाचा आकडा वाढला आहे. राज्यभरात २०२२ या वर्षात १०३ मेंदूमृत अवयवदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील काही शेकडो रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.
राज्यात मेंदूमृत अवयवदानाचे आणि त्याचे वाटपाचे काम ४ विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती काम पाहत असतात. त्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यांतील समितीचा समावेश आहे. या जिल्हानिहाय समिती आपल्या परिसरातील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयातील रुग्णाच्या प्रतीक्षा यादीचे काम पाहत असतात, तसेच मेंदूमृत अवयवांचे वाटप नियमाप्रमाणे करत असतात. मेंदूमृत अवयव दान प्रक्रियेत पुणे आणि मुंबई या विभागीय समितीचे अवयदान मोठ्या प्रमाणावर असते.
गेली मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ होता म्हणून कमी अवयवदान झाले. त्या अगोदरच्या अवयवदानाचा आकडा मोठा होता. येत्या काळात नक्कीच हा आकडा वाढेल असा मला विश्वास आहे. कारण नागरिकामंध्ये याबाबतची जनजागृती होत आहे. सर्व विभागीय समिती अवयवदानाचा आकडा वाढावा म्हणून प्रयत्न करीत आहे. २०१९ सालात मोठ्या प्रमाणात अवयवदान झाले होते. मात्र त्या नंतरच्या काळात कोरोनामुळे आकडा कमी झाला. अवयवाची गरज पाहता नक्कीच अवयवदानाचा आकडा वाढणे गरजेचे आहे.
- डॉ. सुजाता पटवर्धन, संचालक, राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था.
Edited by : Ratnadeep Ranshoor