मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (21:28 IST)

विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल आणि तो काँग्रेसचाच असेल : थोरात

विधानसभेतील अध्यक्ष पद अद्याप रिक्त आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप अध्यक्षाची निवड झालेली नाही. दोन अधिवेशन हे अध्यक्षपदाविना झाले. मात्र, यावेळेच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल आणि तो काँग्रेसचाच असेल असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी सांगितलं.
 
बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदावर भाष्य केलं. या वेळेच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, असं थोरात म्हणाले. अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे, याबाबत थोरात यांनी सांगण्यास नकार दिला. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अध्यक्षपदाच्या नावासाठी निर्णय होईल, असं थोरात यांनी सांगितलं.