1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जानेवारी 2019 (08:55 IST)

आईने मोबाईल दिला नाही म्हणून हुशार विद्यार्थिनीची आत्महत्या

mother
नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने आईने मोबाईल दिला नाही म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली. कोपरखैरणे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित मुलगी अभ्यासात अतिशय हुशार होती. आई-वडिलांनी काही महिन्यांपूर्वी तिला मोबाईल घेऊन दिला होता. तिने अभ्यासाकडे लक्ष द्यावा म्हणून नाताळच्या सुट्ट्या संपल्यानंतर आईने तिच्याकडून मोबाईल काढून घेतला होता. त्यामुळे ती नाराज होती. ती जेव्हा शाळेतून घरी आली तेव्हा तिने आईकडे मोबाईल मागितला. मात्र, आईने मोबाईल दिला नाही तिला नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तिने आईच्या ओढणीने घरातील पंख्याला गळफास घेतला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरु केला आहे.