शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

MIच्या नोट ५ मोबाइलचा स्फोट, घराला आग

शहापूरमधील कासार आळीत MI कंपनीच्या नोट ५ या मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने घराला आग लागली आहे.  या आगीत पती-पत्नीसह दोन लहान मुले जखमी झाले आहेत. राजू शिंदे आणि रोशनी शिंदे असे या दाम्पत्याचे नाव असून ते दोघेही यात ३५ टक्के भाजले आहेत. तर त्यांची लहान मुले किरकोळ जखमी झाले आहेत.
 
शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास राजेश शिंदे मोबाइल चार्जिंगला ठेवून परत झोपले. थोड्यावेळाने अचानक बॅटरीचा स्फोट झाला. स्फोटचा मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील अन्य रहिवासी आणि शेजारची लोक मदतीसाठी शिंदे कुटुंबीयांच्या घराच्या दिशेने पळाले. त्यांनी पाणी व माती फेकून आग विझवली व शिंदे कुटुंबियांना शहापूर उपजिल्हारुग्णालयात नेले.