बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

मुंबई ते पुणे प्रवास आता हवाई टॅक्सीने प्रवास नवीन वर्षात सुरुवात

आता मुंबईहून, पुण्याला तर पुण्याहून मुंबईल रोज प्रवास करणारे अनेकजण असून, एक्सप्रेस हायवेमुळे पुणे, मुंबई अगदी काही तासांच्या अंतरावर पार होते. तर एसटी महामंडळाच्या बसेस, रेल्वेबरोबरच आता ओला, उबर, शेअर टॅक्स असे अनेक पर्याय आहेत. या एक्सप्रेसवेवर असणाऱ्या वाहतुककोंडीमुळे या प्रवासामध्ये अनेकजण नेहमीच अडकून पडत असतात त्यामुळे फार वैताग होतो. मात्र आता येत्या नवीन  वर्षी २०१९ मध्ये  मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांची यामधून सुटका होणार आहे कारण थेट मुंबईहून पुण्यासाठी हेलिकॉप्टर टॅक्सीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
 
अमेरिकेतील सर्वात मोठी हॅलिकॉप्टर सुविधा पुरवणारी फ्लाय ब्लेड कंपनी ही सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. भारतामध्ये या कंपनीने एका स्थानिक कंपनीबरोबर एकत्र येऊन ब्लेड इंडिया नावाने कंपनी सुरु केली आहे. मार्च २०१९ पासून ते भारतामधील हॅलिकॉप्टर टॅक्सीची सेवा सुरु होणार आहे. फक्त  मुंबई पुणे नाही तर शिर्डी आणि इतर शहरांमध्येही या हॅलिकॉप्टर टॅक्सीने कमीत कमी वेळात पोहचा येणे शक्य होणार आहे. ओला, उबरप्रमाणेच ब्लेड इंडियाच्या अॅपवरुन प्रावाशांना हेलिकॉप्टर टॅक्सी बूक करता येईल. टॅक्सीचा दर यापेक्षा भरपूरच कमी आणि जास्तीत जास्त जणांना परवडणार आहे.