रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

संपामुळे पाच दिवस बँक बंद

दिनांक 21पासून पुढचे पाच दिवस बँक बंद राहणार आहेत. याचं कारण फक्त साप्ताहिक किंवा सार्वजनिक सुट्ट्या नसून ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने पुकारलेला संप आहे. 21 डिसेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्राच्या नीती विरोधात ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाला विरोध यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 22 डिसेंबर रोजी चौथा शनिवार, 23 डिसेंबर रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. सोमवारी 24 तारखेला बँक उघडली तरी नागरिकांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागू शकतो. त्यानंतर 25 डिेसेंबर रोजी नाताळची सुट्टी असून 26 डिसेंबर रोजी पुन्हा संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.