1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान

business news
कांद्याच्या घसरलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १५० कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांना कमी दरात कांदा विकावा लागला आहे; त्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत अनुदान मिळणार आहे. १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ दरम्यान कांदा विक्री केलेल्या सर्व उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
 
नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान एकूण ७५ लाख मेट्रिक टन कांदा विक्री झाली आहे. या कांद्याला अनुदान मिळेल, अशी माहिती कृषी पणन विभागाकडून देण्यात आली आहे.