गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 15 डिसेंबर 2018 (09:44 IST)

सलग पाच दिवस बँकांचे व्यवहार बंद

बँक कर्मचारी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँक कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कॉन्फडरेशनने संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 21 ते 25 डिसेंबर असे सलग पाच दिवस बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत.  बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून बँक कर्मचार्‍यांकडून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. तसेच या संपावेळी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे.
 
21 डिसेंबरला शुक्रवार असून याच दिवसापासून बँकांनी संपाची घोषणा केली आहे. 22 आणि 23 डिसेंबरला चौथा शनिवार, रविवार असल्याने बँकांना सुट्टीच राहणार आहे. तर 24 डिसेंबरला सोमवारी बँका उघडतील, परंतु या दिवशी बँकेत गर्दी होण्याची शक्यता आहे. तर 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असल्याने बँका पुन्हा बंद राहतील.