शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

२० रूपयांची नवी नोट चलनात येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच नवीन वैशिष्ट्यांसह २० रूपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. नोव्हेंबर २०१६ पासून नव्या रूपात महात्मा गांधी मालिके अंतर्गत या नोटा जारी करण्यात येत आहे. ही नोट आधीच्या नोटेपेक्षा तुलनेने वेगळा आकार आणि डिझाइनमध्ये आहे.
 
आरबीआयच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०१६ पर्यंत २० रूपयांच्या नोटांची संख्या ४.९२ अब्ज होती. जी मार्च २०१८ पर्यंत १० अब्ज झाली. या चलनातील नोटांची संख्या सध्या ९.८ टक्के इतकी आहे.