शनिवार, 4 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अहमदनगर मनपा महापौर निवडणूक शिवसैनिकांनी छिंदमला चोपले

ahmednagar mayor election
अहमद नगर येथील मनपा निवडूक गाजली ती शिवसैनिकांनी छिंदमला चोपले यामुळे महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत वादग्रस्त अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम ने शिवसेना नगरसेवकांनी मारहाण केली आहे. छिंदम ने शिवसेनेला मतदान केल्याने शिवसेना नगरसेवक चिडले होते, यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.  
 
महापौर,  उपमहापौर पदासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता निवड सभा पार पडली. महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचे बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादीचे संपत बारस्कर यांच्यात तिहेरी लढत होती.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपाचा मार्ग मोकळा झाला होता. राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिल्याने सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला निवडणुकीत बाजी मारता आली नाही.
 
महापौर पदाच्या निवडणुकीत कोण अनुपस्थित राहणार, कोण तटस्थ राहणार यालाही महत्त्व होते. महापालिका कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. मतदान सुरु होताच शिवसेनेने त्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र या  निवडणुकी दरम्यान छिंदम ने  शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. यामुळे चि़डलेल्या शिवसेना नगरसेवकांनी छिंदम यांचे मत ग्राह्य धरु नये, अशी मागणी केली होती. संतापलेल्या सेना नगरसेवकांनी थेट छिंदम ना मारहाण केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.महापौर पदाच्या निवडणुकीत शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम याने शिवसेनेला मतदान केले. छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला आहे. तो कोणाला मतदान करणार याची उत्सुकता होती. त्याने सेनेने उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला. त्यावेळी सेनेच्या नगरसेवकांनी त्याला सभागृहातच मारहाण केली. सेनेने पुढील निवड प्रक्रियेवर बहिष्कार घालत सभात्याग केला.श्रीपाद छिंदमचे मत शिवसेनेच्या कोट्यात मोजण्यात आले आहे. सेनेला स्वत:चे २३ व छिंदमचे १ आणि सपाचे १ असे २५ मते मिळाली.