मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, चांगला, इमानदार अधिकारी नको

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांना मुख्य प्रवाहातून बाहेर काढत थेट एड्स नियंत्रण मंडळावरच नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी तुकाराम मुंढेची नियुक्ती करण्यात आली आहे.  मुंढे यांची मुंबईमध्ये नगरविकास खात्यामध्ये बदली झाली होती. पण, त्याचा पदभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला नव्हता. अखेर त्यांची महिन्याभरामध्ये दुसऱ्यांदा बदली करण्यात आली. एड्स नियंत्रण मंडळामध्ये प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. १२ वर्षाच्या कारकिर्दीतील तुकाराम मुंढे यांची ही तेरावी बदली आहे.

यापूर्वी तुकाराम मुंढे यांची २२ नोव्हेंबर २०१८ रोजी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली मुंबईमध्ये करण्यात आली होती.तुकाराम मुंढे हे एक इमानदार आणि मेहनती अधिकारी आहेत ते शिस्तीत आणि कायद्यात बसेल तेच काम करतात म्हणून ते अनेकदा राजकारणी लोकांना नकोसे असतात.तुकाराम मुंढे हे सर्वाधिक चर्चेत असणारे अधिकारी आहेत त्यांना कोणत्याही ठिकाणी बदली केली तर ते त्यांच्या कामाचा असा ठसा उमटवतात की योग्य प्रकारे आणि चांगले काम होते.