शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (23:43 IST)

आईनं 2 चिमुकल्यानं संपवले

धुरपताबाई गणपत निमलवाड (वय 30 रा. पांडुरणा) असे प्रमुख आरोपीचे नाव आहे. आरोपी महिला पांडुरणा येथे शेत शिवारात आखाड्यावर पती आणि दोन वर्षीय मुलगा आणि ४ महिन्याच्या मुलीसह राहात होती. तर सासु- सासरे दोघे अन्य दुसऱ्या शेतात वास्तव्यास होते. दरम्यान आरोपी धुरपताबाई निमलवाडने 1 जूनला सायंकाळी 6 च्या सुमारास मुलगा दत्ता गणपत निमलवाड (वय 2 वर्षे) व मुलगी अनुसया गणपत निमलवाड (वय4 महिने) या दोघांची पांडुरणा शिवारात हत्या केली.
 
 यानंतर आरोपीने आपली आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड व भाऊ माधव पांडुरंग राजेमोड (दोघे रा. ब्राम्हणवाडा ता.मुदखेड) यांच्या मदतीने दोन्ही मयत लेकरांचे प्रेत जाळून पुरावा नष्ट केला. आरोपी आईने असे कृत्य का केले हे समजू शकले नाही.