राणेंना धक्का देणारा अजुन जन्माला आलेला नाही, ना पुढे येणार : नितेश राणे
राज्यातील ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात भाजपाच्या वाट्याला मोठं यश आल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी खास प्रतिक्रिया देखील दिली आहे.
“देवगड २३ पैकी १८, वैभववाडी १२ पैकी ९, कणकवली ३ पैकी १, मालवण ६ पैकी ५, कुडाळ ८ पैकी ४ ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. तरी देखील सिंधुदुर्गात भाजपा पिछाडीवर म्हणत असाल, तर भाजपा पिछाडीवरच अशीच पिछाडी कायम राहू दे!” असं ट्विट करत नितेश राणे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
तर, “राणेंना धक्का देणारा अजुन जन्माला आलेला नाही, ना पुढे येणार. सिंधुदुर्गातील ९० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व.” असं या अगोदर ट्विट करून नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली होती.