1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (17:55 IST)

जितेंद्र आव्हाड: शरद पवारांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे

Jitendra Awhad
शरद पवार यांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे, असं राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.  
 
विधानसभा निवडणुकांवेळी शरद पवार यांची साताऱ्यात झालेली सभा गाजली होती. या सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावरून व्हीडिओही प्रसिद्ध केले.
 
याच पार्श्वभूमीवर जितेंद्र् आव्हाड म्हणाले, "आजच्याच दिवशी गेल्यावर्षी शरद पवार यांनी भर पावसात छत्री न घेता सभा घेतली होती. आज पुन्हा शरद पवार बांधावर गेलेत. ऐंशी वर्षे त्यांचं वय आहे."
 
"कुठल्याही प्रकारचा धोका असला तरी, कुठलेही आव्हान असलं तरी, ते स्वीकारत बांधावर गेलेत. शरद पवार आणि आव्हानं हे जुनं नातं आहे," असंही आव्हाड म्हणाले.