रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (17:33 IST)

काय म्हणता, जितेंद्र आव्हाड यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट

राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नावेही फेसबुकवर फेक अकाऊंट सुरू असल्याचं समोर आलं आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. फेसबुकवर हे बनावट खातं असून, प्रोफाईलला मोदींचा फोटो आहे.
 
जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या नावे सुरू असलेल्या फेक अकाऊंटची मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.  जितेंद्र आव्हाड साहेब असं अकाऊंटचं नावं असून प्रोफाईलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रभू रामचंद्र यांचा फोटो आहे. राम मंदिरही आहे. तर वॉलपेपरला मोदी यांचा जनतेला संबोधित करतानाचा फोटो आहे.
 
जितेंद्र आव्हाड यांनी या फेक अकाऊंटची मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस व महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार केली आहे. फेक अकाऊंट असून, त्याचा चुकीचा वापर केला जात आहे.