मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (15:13 IST)

मालक लघुशंका करण्यासाठी गेले अन..नोकराने घातला सव्वादोन लाखा रु. दुकान लुटले

The owner went to urinate and the servant put Rs. The shop was looted
नोकराच्या भरवशावर दुकान सोडून मालक लघुशंका करण्यासाठी गेले. मात्र तोपर्यंत नोकराने चक्क सव्वादोन लाख चोरत दुकान लुटल्याची   घटना शिर्डी येथे घडली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की शिर्डी येथील निलेश भाऊसाहेब झरेकर यांचे साई प्रसाद शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये चपलाचे दुकान आहे. या दुकानात नोकर अविनाश अरुण पवार हा मागील चार वर्षांपासून काम करत आहे. दरम्यान पतसंस्थेत तारण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी दुपारी घरून व दोन मित्रांकडून काही उसने असे एकूण दोन लाख २५ हजार रुपयांची रक्कम गल्ल्यात ठेवली. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते लघुशंका करण्यासाठी दुकानाच्या बाहेर गेले असता अविनाश पवार हा दुकानामध्ये होता; दहा मिनिटांनी परत दुकानात आल्यानंतर पवार दुकानात दिसला नाही व गल्ल्यातील पैसेदेखील गायब होते.
 
त्यांनी तात्काळ पवार याच्या मोबाईलवर फोन केला; मात्र फोनही बंद आला. त्यामुळे त्याच्या रूमवर जाऊन त्याचा शिर्डीमध्ये शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. यासंदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.