1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जून 2024 (14:15 IST)

पावसाचा जोर सुरूच!

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यामुळे पावसाचा जोर सुरूच आहे. तसेच राज्यातील अहमदनगरमध्ये देखील पावसाने जोर धरला आहे. तसेच पावसाने दक्षिणेत हजेरी लावली आहे. तर पाथर्डी तालुका व नगरमध्ये पाऊस झाला आहे. 
 
परिसरातील शेतांमध्ये पावसाने पाणी साचल्यामुळे शेतांचे तळे झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक खारोळी नदीवरील बहुतांशी बंधाऱ्यांनी झाली आहे. पेरण्या मात्र सतत होणाऱ्या पावसामुळे  लांबल्या आहे. 
 
मृग नक्षत्रात पावसाने नगर तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. सीना तसेच शेंडी पोखडर्डी येथील नद्यांना महापूर आला होता कारण  
उदरमल, शेंडी, पोखर्डी, जेऊर पट्टयात ससेवाडी, येथे जोरदार पाऊस झाला. आता पेरणी योग्य पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे मात्र सतत पडत असलेली पावसाची धार मात्र शेतरकऱ्याची पेरणी लांबणीवर टाकत आहे. तसेच म्हस्के वस्ती, कोथिंबीरे मळा, माळखास, जेऊर चापेवाडी येथे देखील जोरदार पाऊस झाला. 
 
तसेच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक खारोळी नदीवरील बंधाऱ्यांनी केली आहे. तर शेतकरी वर्गामध्ये समाधान पसरले आहे कारण जेऊर मध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तसेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात कमीतकमी ३५ वर्षानंतर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.